मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ७७३ अंशांनी कोसळून ५८,१५३ अंशांवर तर निफ्टी २३१ अंशांनी कोसळून १७३७५ अंशांवर आला. गेल्या काही दिवसांतील तेजीला आज खीळ बसली. जगभर वाढत असलेली महागाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरांत वाढ होण्याच्या भीतीने ही घसरण दिसून आली आहे. शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीपासूनच घसरण दिसत होती.
आयटी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये ९५४ अंशांची घसरण दिसून आली. विप्रो, टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली. बाजारात बदकांच्या शेअर्स मध्येही घसरण दिसून आली एसबीआय, एचडीएफसी या बँकांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण दिसून आली. जगभरात तसेच देशातही उसळत चाललेल्या महागाईचे सावट बाजारावर दिसत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले होते पण तो उत्साह क्षणिकच ठरल्याचे दिसून आले आहे.