नवीन वर्षात शेअर बाजारात धम्माल सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

03 Jan 2022 18:07:14
मुंबई :नवीन वर्षात शेअर मार्केट मध्ये चांगलीच धम्माल पाहायला मिळाली नवीन वर्षातील व्यवहाराचे शेअर मार्केटने चांगलेच स्वागत केले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसताना सेनसेक्स आणि निफ्टी चांगलाच वधारला. सेन्सेक्स जवळपास 850 अंकांनी वधारला. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 940 अंकांनी वधारत 59,191 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 17,624 अंकावर ट्रे़ड करत होता. निफ्टी हा 270 अंकांनी वधारला होता.
 
share1

 
 
 
ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये सुट्टीमुळे शेअर बाजार बंद राहिला. काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. काही विशेष क्षेत्रातील कंपन्यांना वगळले तर इतर कंपन्यांच्या व्यवसायावर किंचीत परिणाम झाला आहे.
ह्या कंपन्यांचे शेअर वधारले
बजाज फिनसर्वचा शेअर बाजार आज चांगलाच वधारला Bajaj Finserv चा शेअर 3.32 टक्क्यांनी वधारला होता. त्याशिवाय अॅक्सिक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे स्टॉकदेखील वधारले आहेत. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारूती सुझुकीचाही शेअरही वधारला.
त्याशिवाय, विप्रो, लार्सन अॅण्ड ट्रुबो, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली. एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक, इन्फोसिसच्या शेअरमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली. तर, पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर दरात मोठी घट झाली. बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून आली.
Powered By Sangraha 9.0