नासा संस्थेकडून एक अनोखी संधी ; अंतराळ प्रवाशांसाठी आहार तयार करण्याची स्पर्धा

29 Jan 2022 15:53:08
वाशिंग्टन - कॅटरिंग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेच्या नासा संस्थेने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे नासातर्फे ज्या विविध अंतराळ मोहिमा राबवल्या जातात त्या मोहिमांचा भाग असणार्‍या अंतराळ यात्रींचा आहार तयार करण्यासाठी नासाने ही अनोखी स्पर्धा जाहीर केली असून स्पर्धा जिंकणाऱ्याला तब्बल साडेसात कोटी रुपये बक्षिस मिळणार आहेत.
 

antaral 
 
 
नासाच्या सध्याच्या डीप स्पेस मिशनसाठी जे अन्न वापरले जाते ते काही दिवसातच आपला पौष्टिकपणा गमावते ते अन्न खाण्याच्या योग्य राहत नाही त्यामुळे नासाने आत्ता जी योजना घोषित केली आहे त्याप्रमाणेच दीर्घकाळ टिकणारे आणि त्या अन्नातील पौष्टिकपणाही दीर्घकाळ टिकणारे अन्न बनवणाऱ्या लोकांनाच साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धेची घोषणा केली होती पण त्या स्पर्धेतून योग्य असा आहार उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एकदा नासाने या स्पर्धेची घोषणा केली आहे मंगळ मोहिमेसारख्या दीर्घ कालावधीच्या मोहिमेमध्ये जेव्हा अंतराळयात्री दीर्घकाळ अंतराळात राहत असतात तेव्हा त्यांच्या दैनंदिन आहाराचा विचार करून दीर्घकाळ टिकणारे आणि दीर्घकाळ पौष्टिक राहणारे अन्न तयार करावे असे आवाहन आता या स्पर्धेच्या निमित्ताने नासाने केले आहे. 
 
स्पर्धेचे नियम व अटी 
 
. अन्न तयार करत असताना पौष्टिकपणा आणि टिकाऊपणाया दोन गोष्टींचा विचार करत असतानाच हे अन्न अंतराळात सहजपणे तयार करता येणेही आवश्यक आहे.
 
. त्या अन्नातील घटक सहजपणे शरीरात मिसळून जाणे गरजेचे आहे.
एकदा या अन्नाचा आस्वाद घेतला असता दीर्घकाळ भूक लागणार नाही अशा प्रकारचा तो आहार असावा.
अशी अपेक्षाही नासाने या स्पर्धेमध्ये व्यक्त केली आहे अंतराळ मोहिमांच्या प्राथमिक अवस्थेत अंतराळयात्री बेबी फूड प्रकारातील आहार सेवन करत असत.
 
हा आहार टूथपेस्ट सारख्या छोट्याशा ट्यूबमध्ये ठेवला जाईल आणि गरजेप्रमाणे तो आहार सेवन केला जात असे , पण आता मात्र आधुनिक प्रकारचा आहार दिला जातो याबाबत सतत संशोधन सुरू असून या संशोधनाचा भाग म्हणूनच नासाने या स्पर्धेची घोषणा केली आहे दोन हजार पस्तीस पर्यंत मंगळावर माणूस पाठवण्याची नासाची योजना आहे पृथ्वीवरून मंगळावर जाण्यासाठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागत असल्याने एवढा कालावधीचा विचार करूनच हा आहार निर्माण करावा लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0