घरच्या घरी कोरोना टेस्ट आता पडेल भारी; महापालिकेची मेडिकल दुकानदारांना तंबी!

20 Jan 2022 12:25:26
नाशिकः अनेक जण मेडिकलवरून कोरोना किट खरेदी करून स्वतःची टेस्ट करत आहेत. असे नागरिक पॉझिटिव्ह आले तरी त्यांची नोंद महापालिकेकडे असत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कितीतरी पटीने शहरात कोरोना रुग्णांची संख्या असण्याची भीती व्यक्त होत आहे आता घरच्या घरी नाकात काडी घालून कोरोना टेस्ट करणे महागात पडणार आहे. कारण नाशिकमध्ये सरकारी दरबारी नोंद केल्यानुसार कोरोनाची आकडेवारी किती तरी पटीने वाढत आहे. मात्र,. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, त्यांनी मेडिकल चालकांना कडक तंबी देत काही सूचना दिल्या आहेत.
 

test 
 
 
 
अशा आहेत सूचना
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व मेडिकल चालकांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की,
. कोणत्याही ग्राहकाला कोरोना टेस्ट किटची विक्री केली, तर त्याची सारी माहिती मेडिकल मालकाकडे असणे गरजेचे आहे.
. त्यासाठी त्यांनी ग्राहकाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक याची नोंद घेतल्यानंतर संबंधितांना कोरोना टेस्ट किट द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरात केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली आणि ती लपवली, तर संबंधितावर कारवाई होऊ शकते. शिवाय त्यासाठी मेडिकल चालकालाही जबाबदार धरले जावू शकते.
 
रुग्णांमध्ये होत आहे वाढ
 
दुसरीकडे राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल अठराशे खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे.
 
सानुग्रह अनुदान वाटप सुरू
 
कोरोना मृताच्या वारसांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात 304 मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येक 50 हजार रुपये जमा झाले आहेत. येणाऱ्या काळात ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यातही ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते. जिल्ह्यात एकूण 8 हजार 772 कोरोना मृतांची नोंद आहे. मात्र, तब्बल 12 हजार 765 वारसांना या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केल्याचे समजते. त्यात अनेकांनी दोन-दोनदा अर्ज केलेत. तर अनेक मृत्यूची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे या वाढत्या अर्जांनी कोरोना बळीचा आकडाही नंतर वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0