'पुष्पा'च्या आयटम साँग 'ऊ अंतवा'साठी समंथाने 'इतके कोटी' रुपये घेतले

18 Jan 2022 15:10:21
मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Samantha-Oo-Antava-1 
 
हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 'पुष्पा द राइज' या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्यासाठी समांथाने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.
 
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, 'पुष्पा' चित्रपटातील 'उ अंतावा उ उ अंतावा' हे गाणे केवळ ३ मिनिटांचे आहे. या आयटम साँगसाठी समांथाने १ किंवा २ कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर येत होती. मात्र या गाण्यासाठी तिने ५ कोटी रुपये मानधन आकरले आहे. विशेष म्हणजे समांथाने या गाण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. पण अल्लू अर्जुनने तिला हे आयटम साँग करण्यासाठी विनंती केली होती. या विनंतीनंतरच तिने या गाण्याला होकार दर्शवला होता. दरम्यान या गाण्यात काही स्टेप्स करताना तिला अडचणी येत होता. पण त्यानंतर तिने सराव करत उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0