नवापूर तालुक्यात दोन ठिकाणी वनविभागाचे छापे ; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

16 Jan 2022 17:45:18
नवापूर : शहरासह तालुक्यात वनविभागाने दोन ठिकाणी छापे टाकून अवैध तोडीच्या सागवानी, सिसम जातीच्या चौपाट असा सुमारे १ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहरातील भारत फर्निचर मार्ट येथे सागवानी व सिसम जातीच्या लाकडांचे ३६ नग अवैध चौपाट आढळून आले. या लाकडाची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navapur Van Vibhag 
 
नंदुरबार येथील सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या माहिती वरून नवापूर वनक्षेत्रपाल व कर्मचारी तसेच व चिंचपाडा प्रादेशिकसह कर्मचाक्षर्‍यांनी नवापूर शहरातील आसद अब्बास कुरेशी यांच्या भारत फर्निचर मार्ट येथे जाऊन त्यांच्या फर्निचर मार्टची झडती घेतली असता तेथे कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग २३ व सिसम १३ चौपाट नग असे एकूण ३६ नग मिळून आले. या मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत दीड लाख रुपये आहे. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक भिवाजी दराडे, वनपाल खेकडा, ए.एम शेख वनपाल बोरझर, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, विकास शिंदे, अशोक पावरा गिरीश वळवी, सुनिता बडगुजर, भाग्यश्री पावरा, तुषार नांद्रे, रामदास पावरा, संजय बडगुजर आशुतोष पावरा वाहन चालक साहेबराव तुंगार, दिलीप गुरव, वनमजूर छगन सोनवणे बाळा गावीत, फिलिप गावीत यांनी सहभाग भाग घेतला.
शनिवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्यासह वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रा.नवापूर प्रादेशिक यांचेसह चिचलीपाडा गावात जाऊन दिनेश बिजला गावीत रा.चिचलीपाडा याच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घराच्या पडसाळीत कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग १८ व तयार पलंग नग १ मिळून आले.
या मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत ३० हजार रुपये आहे. हि कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनरक्षक संतोष गायकवाड, विकास शिंदे, तुषार नांद्रे, संजय बडगुजर, रामदास पावरा, आशुतोष पावरा, वाहन चालक साहेबराव तुंगार, रोपवन रखवालदार बाळा गावीत यांनी सहभाग घेतला.
Powered By Sangraha 9.0