जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया अव्वलस्थानी

08 Sep 2021 15:55:05
मुंबई : इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वलस्थानी पोहोचली आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर वेस्ट इंडिज तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने 26 गुणांची कमाई करत ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 54.17 आहे. तर पाकिस्तानचा संघ 12 गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे आणि संघाची विजयी टक्केवारी 50 आहे. तिसर्‍या स्थानी वेस्ट इंडिजचा संघ असून, त्यांचेदेखील 12 गुण आहेत आणि विजयी टक्केवारी 50 आहे. चौथ्या कसोटी विजयानंतर भारताचे 26 गुण झाले असून पराभवानंतर इंग्लंडची विजयी टक्केवारी 29.17 अशी आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
 
team_1  H x W:
 
टीम इंडियाचा उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी चांगली कामगिरी करीत भारताला चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 157 धावांनी विजय मिळवून दिला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी मालिकेत 60 गुण मिळणार आहेत. या सर्व गुणांचा विचार केल्यास भारतीय संघाने आतापर्यंत इंग्लंड दौर्‍यात दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना ड्रॉ झाला आहे.
Powered By Sangraha 9.0