अवनीने रचला इतिहास... सुवर्णानंतर कांस्य पदकाची कमाई

03 Sep 2021 13:52:40
टोकयो : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये १९ वर्षीय अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदकानंतर कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. ५० मीटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनीने कांस्य पदकाची कमाई केली आहे. अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली.
 
Avani Lekhara_1 &nbs
 
या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावं पदक आहे. अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होतं. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
Powered By Sangraha 9.0