अन्...अमिताभ यांनी केले कौतुक

28 Sep 2021 16:30:58
मुंबई :  'बिग बी' अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक आठवणी, फोटो शेअर करून चाहत्यांशी संवाद साधतात. आज त्यांनी आयुष नावाच्या चाहत्याचा फोटो शेअर केला. दिव्यांग असलेल्या आयुषने पायाने अमिताभ यांचे चित्र काढले आहे. 'जलसा' बंगल्याबाहेर दर रविवारी चाहत्यांची गर्दी होते. त्या आठवणी आयुषने चित्रांच्या माध्यमातून जागवल्या. आपल्याला माहीत आहे की, जगभरात अमिताभ यांचे करोडो चाहते आहेत. त्यांची एक झलक बघण्यासाठी कित्येक चाहते 'जलसा' बंगल्याबाहेर ताटकळत उभे असतात. अमिताभदेखील चाहत्यांना नाराज करत नाहीत.
 
 

abhi_1  H x W:   
 
ते हात उंचावून अभिवादन करून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. हे दृश्य दिव्यांग आयुषने कॅनव्हासवर उतरवले आहे. आयुषच्या टॅलेंटवर 'बिग बी' खूश झाले आहेत. त्यांनी दिव्यांग आयुष आणि त्याचे चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटोला कॅप्शन देताना अमिताभ यांनी लिहिलंय, ''आयुष रविवारी 'जलसा' गेटबाहेर होणारी हितचिंतकांची गर्दी 'मिस' करतोय. आयुषने चित्रातून त्या आठवणी जागवल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0