अक्षय कुमारने मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

27 Sep 2021 12:37:35
मुंबई :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चित्रपट सृष्टीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून थिएटर बंद असल्याने अनेकजण बेरोजगार झालेत. मात्र आता महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं आहे. या निर्णयानंतर अक्षय कुमारने फेसबुकवर पोस्ट शेअर केली.
 
 
 
Akshay111_1  H
 
 
अक्षयने एक फोटो शेअर करत म्हटलं की, अनेक कुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहं २२ ऑक्टरबरपासून खुली करण्यास परवानगी मिळल्याने आनंदी आहोत. तसेच तो पुढे म्हणाला की, 'किसे के रोके ना रुकेगी, आ रही हे पोलिस'. अक्षयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो स्वत:, रणवीर सिंग, अजय देवगण आणि रोहित शेट्टी दिसतायत.
Powered By Sangraha 9.0