'या' सामन्यासाठी भारताच्या दौऱ्यावर चार क्रिकेट संघ

21 Sep 2021 16:40:31
मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाच्या 2021-22 हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, पुरुषांच्या टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम तीन दिवसानंतर 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या दौऱ्यावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट संघ येणार आहेत, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी दिली आहे. 

cricket_1  H x  
 
 
बीसीसीआयच्या बैठकीत या वेळापत्रकाला हिरवा सिग्नल दिल्यानंतर भारत चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि 14 टी -20 सामने आयोजित करणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका नोव्हेंबर 2021 आणि मार्च 2022 मध्ये अनुक्रमे दोन कसोटी आणि प्रत्येकी तीन टी -20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. वेस्ट इंडिज फेब्रुवारी 2022 मध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 सामन्यांसाठी भारताचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत घरच्या मैदानावर चार कसोटी, 14 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार न्यूझीलंड (नोव्हेंबर-डिसेंबर), वेस्ट इंडीज (फेब्रुवारी 2022), श्रीलंका (फेब्रुवारी-मार्च 2022) आणि दक्षिण आफ्रिका (जून 2022) हा संघ भारताचा दौरा करणार आहेत.
भारतीय संघ डिसेंबर 2021-जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल आणि इंडियन प्रीमियर लीग एप्रिल-मेमध्ये (2022) होईल. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे तर वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारत दौऱ्यावर श्रीलंका संघ दोन कसोटी आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा अवघ्या 10 दिवसांचा असेल ज्यात त्यांना पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. चार कसोटी सामन्यांपैकी न्यूझीलंडविरुद्धचे दोन सामने कानपूर आणि मुंबई येथे खेळले जाणार आहेत. तसेच श्रीलंकेविरुद्धचे सामने बंगळुरू आणि मोहालीमध्ये होणार आहेत. रोटेशन धोरणानुसार, 17 मर्यादित षटकांच्या सामन्यांची ठिकाणे निवडण्यात आली आहेत ज्यात जयपूर, रांची, लखनौ, विशाखापट्टणम, कोलकाता, अहमदाबाद, कटक, त्रिवेंद्रम, चेन्नई, राजकोट, दिल्ली यांचा समावेश असणार आहे.
Powered By Sangraha 9.0