माधोपुर : मगर दिसतेच इतकी खतरनाक की तिला लांबून जरी पाहिले तरी अंगाला घाम फुटतो. अशातच मगर चक्क घरात शिरल्यानंतर काय गोंधळ उडाला असेल, याची कल्पनाच नको. अशीच एक घटना राजस्थानातील माधोपूर परिसरात घडली आहे. राजस्थामधील सवाई माधोपुर मध्ये एका घरात मगर घुसल्याने, त्या घरातील नागरिकांचे हाल-बेहाल झाले. ही मगर घरात आरामात फिरत असतांना, घरातील नागरिक मात्र भीतने जीव वाचवण्यासाठी छतावर चढले होते.
वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग त्वरित तेथे दाखल झाले. त्या मगरीला पकडताना पाहायला संपूर्ण परिसरातील लोकांनी घोळखा घातला होता. जसे मगरीने गुटल्या खायला सुरुवात केली तसे सगळेजण दूर पळाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी तिच्यावर दोरखंड फेकण्यात आले. त्यानंतर दोरखंडाच्या अडकलेल्या मगरीला, वनविभागाच्या गाडीमध्ये बंदिस्त करण्यात आले. या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागले. वनविभागाचे अधिकारी वेळीच पोहोचले, म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. मगर आणि परिसरातील नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.