निर्देशांक, निफ्टीने गाठला विक्रमी स्तर

04 Aug 2021 14:18:25
मुंबई : दिग्गज कंपन्या एचडीएफसी, इन्फोसिस आणि टीसीएसच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने आज मंगळवारच्या सत्रात निर्देशांकाने 873 अंकांची भरारी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीनेही प्रथमच 16 हजार अंकांचा पल्ला ओलांडला आहे. निर्देशांकाने 872 अंकांची उसळी घेत आजवरचा 53,823.36 अंकांचा उच्चांक गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 245.60 अंकांच्या कमाईसह 16,130.75 या स्तरावर बंद झाला. 
 
Stock Market_1   
 
आजच्या सत्रात टायटन कंपनीच्या समभागांनी सर्वाधिक कमाई केली. या समभागांचे मूल्य चार टक्क्यांनी उसळले. त्यानंतर एचडीएफसी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, अल्ट्रा टेक सिमेट आणि भारती एअरटेलच्या समभागांनी कमाई केली. दुसरीकडे बजाज ऑटो, टाटा स्टील आणि एनटीपीसी कंपनीच्या समभागांची मात्र घसरण झाली. तेजीत व्यवहार करणार्‍यांनी खरेदीचा सपाटा लावल्याने निफ्टी आज 16 हजारांवर गेला, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
Powered By Sangraha 9.0