भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

13 Aug 2021 14:54:28
भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला
चार वर्षाच्या मुलाच मृत्यू
जम्मू : जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भाजपचे नेते जसबीर सिंह यांच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात सिंह यांच्या चार वर्षाच्या भाच्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. जसबिर सिंह यांच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी पिपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अनंतनागमधील भाजप नेते गुलाम रसूल डार यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. या ग्रेनेडच्या स्फोटात त्यांच्या घरातील आठ जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
 

BJP_1  H x W: 0 
 
 
श्रीनजर जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान व दोन सामान्य नागरिक जखमी झाले. या चकमकीत एक दहशतवादी देखील ठार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. दहशतवादी घातपाताचा कट रचत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
जम्मू कश्मीरभाजपचे नेतेगुलाम रसूल डारनिर्घृण हत्याघातपात
https://www.tarunbharatjalgaon.com//Encyc/2021/8/13/Grenade-attack-on-BJP-leader-s-house.html
Powered By Sangraha 9.0