वाढता ब्लॅक फंगस...लक्षणे ओळखा
देशात ब्लॅक फंगसची (Black Fungus) प्रकरणे भयंकर प्रकारे वाढत आहेत. आतापर्यंत सुमारे 11 हज़ार प्रकरणे समोर आली आहेत, तसेच इतरही नवीन फंगल इन्फेक्शनची प्रकरणे आहेत. या आजारात उपचारास उशीर केल्यास शरीराची मोठी हानी होऊ शकते. या संसर्गाची अनेक लक्षणे आहेत, ज्यापैकी एक डोकेदुखी आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर डोकेदुखी होणे सामान्य गोष्ट आहे, पण 14 दिवसांच्या रिकव्हरीनंतरसुद्धा सतत डोकेदुखी होणे ब्लॅक फंगसचा (Black Fungus) संकेत असू शकते. डोकेदुखी प्रत्यक्षात फंगसमुळे होणारी सूज आणि संसर्गाचे प्राथमिक लक्षण आहे.
हा संसर्ग घातक होऊ शकतो
ब्लॅक फंगल किंवा म्यूकोर-मायकोसिस एक दुर्मिळ संसर्ग असून तो कमजोर प्रतिकारशक्ती आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना होतो. हे सामान्यपणे त्या रूग्णांमध्ये दिसून येत आहे ज्यांना मोठ्या कालावधीपर्यंत स्टेरॉईड दिले गेले होते, जे मोठ्या कालावधीपर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल होते, ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरवर होते, अस्वच्छता किंवा जे डायबिटीज सारख्या इतर आजारांसाठी औषध घेत आहेत. जर वेळेवर याचा उपचार केला गेला नाही तर हा संसर्ग घातक होऊ शकतो.
तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यानुसार, जर तुम्हाला तोंडाचा रंग बदलणे आणि चेहर्याच्या कोणत्याही भागात बधीरपणा, अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला ब्लॅक फंगसची तपासणी केली पाहिजे. गुलेरिया यांनी म्हटले, जर तुमचे नाक बंद होत आहे आणि जोर लागत असेल तर हे सुरूवातीचे संकेत आहेत की, ब्लॅक फंगसबाबत चिंता केली पाहिजे. याशिवाय जर तुमच्या दातांमध्ये ढिलेपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
स्टेरॉयडच्या अति वापरामुळे वाढली प्रकरणे
ब्लॅक फंगसची चाचणी करण्यासाठी सायनसचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन केला जातो. तसेच नाकाच्या एंडोस्कोपीच्या माध्यमातून बायोप्सी सुद्धा केली जाऊ शकते. त्यांनी सांगितले की ब्लड टेस्टिंगद्वारे सुद्धा याचा शोध घेतला जाऊ शकतो. डॉ. गुलेरिया यांनी म्हटले की, भारतात ब्लॅक फंगसची जास्त प्रकरणे समोर येत आहेत. मात्र हे संसर्गजन्य नाही. कारण डायबिटीज आणि स्टेरॉईडचा जास्त वापर करणारी मोठी लोकसंख्या संसर्गजन्य नाही. त्यांनी म्हटले, पहिल्या लाटेत सुद्धा म्यूकोर्मिकोसिसची प्रकरणे समोर आली, मात्र स्टेरॉयडच्या अति वापरामुळे दुसर्या लाटेदरम्यान संख्या जास्त झाली आहे.