राणीच्या चित्रपटाची रिलीज डेट निश्‍चित

08 Dec 2021 15:10:36
मुंबई : राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'ची रिलीज डेट निश्‍चित झाली आहे. अशिमा छिबिबर दिग्दर्शित हा सिनेमा 20 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे. आपल्या मुलांसाठी चक्‍क एका देशाशी लढणाऱ्या एका महिलेची ही कथा असणार आहे. मानवी स्वभावातील लवचिकता दर्शवणारी ही कथा आहे.सर्व महिलांना ही कलाककृती समर्पित केली जावी, अशी ही कथा आहे, असे राणीने सांगितले. कोविड-19 च्या साथीमध्ये या सिनेमाचे शूटिंग एस्टोनियामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
 
rani_1  H x W:
 
'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा राणीचा 2019 नंतरच्या 'मर्दानी 2'नंतरचा दुसरा सिनेमा आहे.राणी मुखर्जी सध्या 'बंटी और बबली 2'च्या रिलीजची वाट बघते आहे. कोविड-19 च्या काळात इतर अनेक सिनेमांच्या रिलीजप्रमाणेच या सिनेमाची रिलीज डेटदेखील वारंवार पुढे ढकलण्यात आली आहे. 'बंटी और बबली'च्या पहिल्या भागात अभिषेक बच्चनबरोबर राणीने धमाल उडवून दिली होती. आता दुसऱ्या भागात तिच्याबरोबर अभिषेकऐवजी सैफ अली खान असणार आहे.
Powered By Sangraha 9.0