अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडी कार्यालयात

08 Dec 2021 15:51:22
नवी दिल्ली : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर आज जॅकलीन दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाली. तिथं तिची चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
 
jacklin_1  H x
 
सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.
Powered By Sangraha 9.0