चुरचुरीत कायलोळी !

03 Dec 2021 20:05:13
  कोकण : कोकणातील (konkan) काही खास पारंपरिक पदार्थ जे आता विस्मरणात गेले आहेत त्यांची रेसिपी जाणून घेत, हे पदार्थ करून बघावेत असेच आहेत. एक वेगळी आणि पारंपरिक चव चाखण्यासाठी नक्की करून बघा कोकणी नाश्त्याचा पदार्थ ‘कायलोळी'! मुळात हा पदार्थ कर्नाटकात (karnatak) बनविला जात असे पण, हळूहळू तो कोकणातही लोकप्रिय झाला. पौष्टीक आणि चुरचुरीत अशी कायलोळी (kayloli) बनविण्याची सोपी पद्धत...!
 
chur_1  H x W:
 
साहित्य :
 
- १ कप तांदळाचं पीठ
- १/४ कप बारीक रवा
- चवीनुसार मीठ
- १/२ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट
- १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
- पाणी
- शेंगदाणा तेल
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली कोथिंबीर
चटणीसाठी -
- १ चमचा उडीद डाळ
- ३/४ सुक्या लाल मिरच्या
- ३/४ काळी मिरी
- अर्धा इंच आल्याचे तुकडे
- ४ मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरं
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
 
कृती :
 
तांदळाचे पीठ, रवा, मीठ, हळद-तिखट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची याचे पाणी घालून सरसरीत मिश्रण तयार करावे. पारंपरिक पद्धतीने हा पदार्थ बनविताना हे पीठ दुधानेही भिजवले जाते. पाणी की दूध हा ऐच्छिक पर्याय आहे पण, दुधाने भिजविल्यास चवीत नक्कीच फरक पडतो. आता मिश्रणात एक चमचा गोडे तेल, बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर घालून दहा मिनिटांसाठी हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवा.
 
तोपर्यंत, टोमॅटोची चटणी बनवू या. कढईत चमचाभर तेल घेऊन, त्यात उडदाची डाळ, लाल मिरच्या, काळे मिरी आणि आल्याचे तुकडे घालून छान परतून घ्या. आता त्यात चार मध्यम आकाराचे टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे. आता पुन्हा फोडणी करूया. चमचाभर तेलात जिरं-मोहरी आणि qहग घालून या फोडणीत पेस्ट घालून चार-पाच मिनिटे परतून घ्या. ही चटणी फ्रिजमध्ये छान राहते.
 
आता कायलोळी बनविण्यासाठी तव्यावर चमचाभर तेल घालून, तयार मिश्रण ढवळून त्याचे धिरडे घाला. एक मिनिट झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी परतून घ्यावे. टोमॅटोच्या चटणीसोबत गरमागरम सव्र्ह करा कायलोळी !
Powered By Sangraha 9.0