लवकर येणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा

07 Nov 2021 19:53:37
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुळकर्णीने आजवर विविध पठडीतील भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
sonali_1  H x W 
 
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशियो फिल्म्स यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडममधील नावाजलेली ब्लॅक हँगर स्टुडिओ आणि ओरवो स्टुडिओ मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करीत आहेत.
चित्रीकरण आणि तांत्रिक बाबीदेखील लंडनमध्येच होणारा मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग‘जी भाषेत चित्रीत होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. नवीन वर्षात तो प्रदर्शित होईल. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
Powered By Sangraha 9.0