आज 8 आयपीएल फ्रँचायझी करणार खेळाडूंची घोषणा

30 Nov 2021 17:07:31
नवी दिल्ली : आयपीएल 2022 चे काउंटडाउन आजपासून (30 नोव्हेंबर 2021) सुरू होणार आहे. पुढील वर्षी आयपीएलच्या नवीन हंगामासाठी मेगा लिलाव सुरू होण्यापूर्वी आज जुने 8 संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा करतील. काही प्रमुख संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे समोर आली असली तरी त्यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
 

ipl_1  H x W: 0 
 
 
आज 8 संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करणार आहेत. आयपीएलच्या सध्याच्या 8 फ्रँचायझींनी बीसीसीआयला मंगळवारी दुपारपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या नावांची माहिती द्यावी लागेल. एक संघ सध्याच्या संघातील जास्तीत जास्त ४ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. ही संख्या 2018 च्या लिलावापेक्षा 1 अधिक आहे. कोणताही संघ 4 कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 विदेशी खेळाडू ठेवू शकतो. जो संघ 4 खेळाडूंना कायम ठेवतो त्यांना त्यांच्या बोलीच्या एकूण 90 कोटींच्या बजेटमधून 42 कोटी उणे मोजावे लागतील. दुसरीकडे, 3 खेळाडूंना रिटेन करणार्‍या संघात 33 कोटींची कपात होईल. 2 खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या संघाला 24 कोटी रुपयांची कपात केली जाईल, तर 1 खेळाडू कायम ठेवणाऱ्या संघाला 14 कोटी रुपयांची कपात करावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0