मुंबई : कॅन्सरला हरवून किरण खेर अखेर कामावर परतल्या आहेत. 69 वर्षांच्या किरण खेर लवकरच 'इंडियाज् गॉट टॅलेंट'चा नवा सीझन जज करताना दिसणार आहेत. शिल्पा शेट्टी मनोज मुंतशीर आणि बादशाहसोबत हा सीझन त्या जज करणार आहेत. शोचं शूटींगही सुरू झालंय आणि सेटवर आनंदाचं वातावरण आहे. शिल्पाने सेटवरचा एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे.
या व्हिडीओत किरण व शिल्पा शेट्टी धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. क्रिम कलरची साडी, त्यावर भरगच्च दागिने आणि कोरोनापासून बचावासाठ फेस शील्ड घातलेल्या किरण खेर नेहमीप्रमाणे आपल्या चिरपरिचीत अंदाजात दिसत आहेत. किरण काहीशा अशक्त दिसत आहेत. पण चेह-यावरचं हास्य आणि त्यांचा सळसळता उत्साह तोच आहे.