विकी-कॅटच्या लग्नात 'या' गोष्टीला परवानगी नाही

25 Nov 2021 16:43:19
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. पण, या लग्नसोहळ्यापूर्वीच त्यांच्या या नव्या प्रवासाबाबतच्या काही अटी समोर आल्या आहेत. आता म्हणे विकी आणि कतरिनाच्या विवाहसोहळ्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल सोबत आणण्याची परवानगी नसेल. लग्न होणाऱ्या ठिकाणी मोबाईल डिटेक्टर सुरु करण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातील कोणताही फोटो पोस्ट केला जाऊ नये, यासाठीच ही सोय केली जात आहे.
 
cat_1  H x W: 0
 
कतरिना आणि विकी या दोघांच्याही टीम सध्या त्यांच्या या विवाहसोहळ्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. रोका सेरेमनीची बातमी लिक झाल्यापासून या दोघांकडूनही लग्नाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. अद्यापही विकी किंवा कतरिनानं त्यांच्या लग्नासंबंधीची कोणहीती माहिती अधिकृतपणे समोर आणली नाही. ज्यामुळं अखेरच्या क्षणापर्यंत ही गोपनीयता त्यांच्याकडून पाळली जाणार आहे. लग्नाचं सर्व आयोजन पाहणाऱ्या इवेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0