पुनीत राजकुमारवर चित्रपट येणार

24 Nov 2021 17:53:15
बंगळुरू : हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यासोबत ‘युवारथना’ या सुपरहिट चित्रपटात काम करणारे निर्माते संतोष आनंदराम यांनी पुनीत यांच्यावर बायोपिक काढणार असल्याचे संकेत दिले आहेत. संतोष यांना समाजमाध्यमावर एका चाहत्याने पुनीत यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची विनंती केली होती. त्या चाहत्याला उत्तर देत त्यांनी पुनीतचा बायोपिक पडद्यावर आणण्यासाठी मी माझ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे म्हटले आहे. 
 
rajkumar_1  H x
 
Powered By Sangraha 9.0