अभिजीत बिचुकले Big Boss 15 मध्ये

22 Nov 2021 14:22:35
मुंबई : एका माणसाने नुकतचा हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केला आहे. हा कुणी साधा-सुद्धा माणूस नसून ही एक अष्टपैलू व्यक्ती आहे. असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे 'अभिजित बिचुकले' यांनी आता सलमान खानच्या हिंदी 'बिग बॉस 15' मध्ये एन्ट्री केली आहे. अभिजित बिचकुले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहे.
 

bichacule_1  H  
 
'बिग बॉस'चे यंदाचे हे 15 वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अश्यातच बिग बॉसच्या घरात तीन नव्या स्पर्धकांची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले हे तीन स्पर्धक आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या मंचावर आल्यावर स्वतःची ओळख करून देताना अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं की.., मी आर्टिस्ट आहे, लेखक आहे, कवी, गायक आहे. आणि एके दिवशी मी देशाचा पंतप्रधानही होईन. असं ते म्हणाले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Powered By Sangraha 9.0