भारतपाठोपाठ न्यूझीलंडनेही कर्णधार बदलला

16 Nov 2021 12:23:06
नवी दिल्ली : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता
 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप 
यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. टीम इंडियानं काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देताना ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. १४ नोव्हेंबरला फायनल झाल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू सोमवारी भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. पण, कर्णधार केन विलियम्सन हा भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं. रोहित शर्मा (हा टीम इंडियाचा नवा कर्णधार असणार आहे, तर राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकाचा जबाबदारीत दिसणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना उपविजेतेपद पटकावले.
 

cricket_1  H x  
 
 
न्यूझीलंडचा संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. १७ नोव्हेंबरपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. केननं कसोटी मालिकेला प्राधान्य देताना एक आठवड्याची विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे तो ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. २५ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केनच्या अनुपस्थितीत टीम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व सांभाळणार आहे. दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेणाऱ्या ल्युकी फर्ग्युसनचे कमबॅक झाले आहे.

येथे रंगणार सामने
पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर
दूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांची
तिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
Powered By Sangraha 9.0