बिग बॉस मराठीच्या घरामधून नीथा शेट्टी-साळवी बाहेर

15 Nov 2021 12:02:24
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साजरा झाला बालदिन. यानिमित कलर्स मराठी परिवरातील दोन चिमुकल्या सदस्यांनी घेतली सदस्यांची भेट. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. लहानपणीच्या गोड आठवणी सदस्यांनी सांगितल्या. तर सदस्यांच्या धम्माल नकलांनी रंगली बिग बॉसची चावडी. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे मीनल सांगितली. दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.
 
nitha_1  H x W:
 
या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. आता नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले महेश मांजरेकरांनी सांगितले. नीथा शेट्टी - साळवी हिला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
Powered By Sangraha 9.0