न्यूझीलंड लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

10 Nov 2021 12:39:46
नवी दिल्ली : 14 नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाली की 17 नोव्हेंबर पासून भारतात 5 संघांचे टी-20 सामने रंगणार आहेत. या सामन्यांचे वेळापत्रकही नुकतंच जाहीर करण्यात आलं. यात भारतासह, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरूद्ध रंगणार असून बीसीसीआयने संघही जाहीर केला आहे. 


newzilznd_1  H  
 
 
या सामन्यासाठी कर्णधार पदाची धूरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. के एल राहुल संघाचा उपकर्णधार आहे. तर ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर आश्विन, अक्सर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर, हर्शल पटेल आणि मोहम्मद सिराज यांची निवड करण्यात आली आहे. तर विश्वचषक 2021 मध्ये खेळलेल्या 8 खेळाडूंना न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड विरूद्धचे हे टी-20 सामने 17 , 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी खेळवे जाणार आहेत. टी-20 सामन्यानंतर 25 ते 29 नोव्हेंबर आणि 3 ते 7 डिसेंबर असे दोन कसोटी सामने रंगणार आहेत.
Powered By Sangraha 9.0