सूर्यवंशी लवरकच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

09 Oct 2021 17:20:44
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रदर्शन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले. आता, 22 ऑक्‍टोबरपासून महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर निर्माते त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहेत.
 
 
suryawanshi_1  
दिवाळीनिमित्त अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांना खास भेट देणार आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या निमित्ताने 'पोलीस' येत असल्याची माहिती दिली, पण त्याने तारीख जाहीर केली नाही. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, सूर्यवंशी दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित होईल की, दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होईल. दरम्यान, 'सूर्यवंशी' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच रणवीर सिंग आणि अजय देवगण पाहुण्यांच्या भूमिकेत दिसतील.
Powered By Sangraha 9.0