विकी कौशल-कतरिनाचा लग्नसोहळा शाही किल्ल्यामध्ये

28 Oct 2021 16:43:24
मुंबई :  बॉलिवूडची स्टार अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता, लवकरच त्यांच्या लग्नाची सनई ऐकायला मिळणार आहे. आता हे जोडपे लवकरच लग्न करणार असून, कतरिना आणि विकी कौशलचे ग्रँड वेडिंग केव्हा आणि कुठे होणार,याची माहिती समोर आली आहे.
 

viki_1  H x W:  
 
अभिनेत्री कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे ठिकाण ठरवण्यात आले असून, यांचे लग्न राजस्थान मधील रणथंबोर नॅशनल पार्कपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूर येथील एका किल्ल्यात होणार आहे, ज्याचे नाव 'सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा' असे आहे. 'सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा' हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
Powered By Sangraha 9.0