शिल्पा विभक्त होणार?

24 Oct 2021 16:09:54
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुफान चर्चेत आली होती. पती पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या जाळ्यात अडकल्यामुळे शिल्पाच्या अडचणींमध्ये देखील मोठी वाढ झाली होती. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तब्बल दोन महिने तुरूंगात होता. या दरम्यान शिल्पा सोशल मीडिया आणि चित्रीकरणापासून दूर होती. एवढंच नाही तर राज आणि शिल्पा विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता देखील शिल्पा आणि राजच्या नात्यांमुळे चर्चांनी वेग धरला आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या दोन मुलांसोबत आणि आईसोबत दिसत आहे. शिल्पा पती राजला सोडून फक्त मुलं आणि आईसोबत आलीबागला फिरायला निघाली आहे.
 
 
shilpa_1  H x W 
 
 
हे चित्र पाहून शिल्पा आणि राजमध्ये काही बिनसलं आहे का? ते विभक्त होणार का? अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. पण याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने वर्क फ्रंटपासून स्वतःला दूर केले होते. तिने सर्व रिअॅलिटी शो आणि इतर कार्यक्रमांना जाणे बंद केले होते. मात्र, राजला जामीन मिळाल्यापासून ती कामात सतत सक्रिय असते. अनेकवेळा लोक सोशल मीडियावर तिला सोशल मीडियावर ट्रोल करत असतात.
Powered By Sangraha 9.0