ओम-स्वीटू पुन्हा एकत्र येणार?

22 Oct 2021 13:06:54
मुंबई :  ऐन लग्नात ओम भर मांडवात स्वीटूला सोडून गेल्यामुळे तिच्या मनात ओमविषयी प्रचंड राग होता. या रागाच्या भरात अनेकदा तिने ओमचा अपमान केला, त्याच्याशी तोडून वागत राहिली. परंतु, दादांमुळे तिला लग्नाची दिवशी घडलेली घटना समजली. ज्यामुळे आता स्वीटू समोर सत्य परिस्थिती आली आहे. सत्य समजल्यानंतर स्वीटूने ओमला माफ केलं आहे. त्यामुळे ओम आता पुन्हा त्याच्या घरी खानविलकर हाऊसमध्ये राहायला आला आहे. परंतु, याच काळात दोघांमधील जवळीक वाढताना दिसणार आहे.

om_1  H x W: 0  
 
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओम आणि स्वीटू दोघंही खानविलकरांच्या घरात राहत असून मोहित मुद्दाम घरातील लाईट बंद करतो. ज्यामुळे स्वीटू घाबरते आणि ओरडायला लागते. स्वीटूला घाबरलेलं पाहून ओम लगेच तिच्याकडे धाव घेतो आणि मोबाईलची बॅटरी लावतो. याच काळात मोहित मालविकाला स्वीटू- ओममधील जवळीक वाढत असल्याचं सांगतो. दरम्यान, मोहितने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मालविका शकूला हा प्रसंग सांगणार आहे. त्यामुळे स्वीटूच्या पुढील आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शकू महत्त्वाचं पाऊल उचलताना दिसणार आहे. म्हणूनच, आता ओम-स्वीटूला विभक्त करण्यासाठी शकू पुढाकार घेणार की तिच्यामुळे हे दोघं पुन्हा एकत्र येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0