तरुणाने दाखवून दिली अमिताभ बच्चन यांना चूक

20 Oct 2021 17:09:41
मुंबई :  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये स्पर्धकांना प्रोस्ताहन देण्यासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अनेकदा बिग बी शोमध्ये त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता ऐकवत असतात. बिग बींचे देखील हिंदी भाषेवर चांगलेच प्रभूत्व आहे. शो असो किंवा एखादी मुलाखत, बिग बी अनेकदा हिंदीतूनच संवाद साधत असतात. नुकतीच बिग बींकडून हिंदीमध्ये शेअर केलल्या पोस्टमध्ये एक चूक झाली. त्यांच्याच एका चाहत्याने ही चूक लक्षात आणून दिली आणि बिंग बींनी त्याबद्दल माफी मागितली.
 

abhi_1  H x W:  
पाटणातील तरुण राजेश पांडेने फेसबुकवर बिग बींनी केलेल्या एका पोस्टवर कमेंट करत त्यांना चूक लक्षात आणून दिली. बिग बी आणि या तरुणातील चॅट आता चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाने बिग बींना त्यांनी दसर्‍याला दिलेल्या शुभेच्छामंध्ये चूक दाखवून दिली. ‘दशहरा’ आणि ‘पेशेवर’ हे दोन शब्द अशुद्ध लिहिले असल्याचे त्याने कमेंटमध्ये सांगितले. बिग बींनी ‘दशहरा’ लिहिण्याएवजी दशहेरा लिहिले होते. तसेच राजेशने बिंग बींच्या एका जुन्या सिनेमातील डायलॉगमध्ये देखील चूक होती, हे निदर्शनास आणून दिले. ‘खुदा गवाह’ या सिनेमात बिंग बींनी पेशेवर मुजरिम म्हणण्याएवजी पेशावर मुजरिम म्हटले होते, असे त्याने ध्यानात आणून दिले.
Powered By Sangraha 9.0