आजचा मेनू -उपवासाचा केक

14 Oct 2021 12:09:44
साहित्य
शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम.
साजूक तूप १०० मिली.
पिठी साखर १०० ग्रॅम
खजूर २० बिया
बेकिंग पावडर एक टीस्पून
खायचा सोडा अर्धा टीस्पून
अर्धा टीस्पून वेलची पावडर
नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली
दीड वाटी दूध
साधी साखर तीन टीस्पून
बदाम सजावटीसाठी
 

cake_1  H x W:  
 
कृती
अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. त्या मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे. १८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे. दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा.
Powered By Sangraha 9.0