आपल्या लहानपणापासून आपण फेअर अँड लव्हलीची जाहिरात पाहत आलोय. आता याच फेअर अँड लव्हलीतील ‘फेअर’ गायब होणार असून हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने ब्रँड फेअर अँड लव्हलीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवे नाव देण्यात येईल.
नव्या रूपात दिसणार्या फेअर अँण्ड लव्हली ब्रँड वेगवेगळ्या स्किन टोनच्या महिलांवर केंद्रीत असेल. 45 वर्षांपूर्वी एक गोरं करणारी क्रीम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच करण्यात आले होते. मात्र आता याचं रिब्रँडिंग केलं जाणार आहे. रंगावरून भेदभाव केला जात असल्याचा कंपनीवर आरोप करण्यात आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.हिंदुस्तान युनिलिव्हरने सांगितले की, कंपनी आपल्या ब्रँडच्या नावातून ‘फेअर’ शब्द काढणार आहे. नव्या नावासाठी त्यांनी अर्ज केला आहे, ज्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. दक्षिण आशियात युनिलिव्हर स्किन लाइटनिंग क्रीमच्या मार्केटिंगमध्ये बदल करण्याची तयारी करीत असल्याची चर्चा बर्याच काळापासून होती. गोरं करणारी क्रीम म्हणून प्रचार केला जात आहे, त्याला विरोध केला जात
आहे.