धुळे

साक्री तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पांझरा व कान या नद्यांनी केले रौद्ररूप धारण !

साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे...

२५ हजारांच्या लाच प्रकरणी अप्पर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

येथील एका इसमाचे तालुक्यातील ढोलीपाडा शिवारामध्ये शेत जमीन आहे सदर शेतजमिनीच्या प्रकरणाबाबत पिंपळनेर अप्पर तहसीलदार विनायक थविल यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र वारंवार पैशांची मागणी आणि विविध कारणे देऊन संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडे पैशांची मागणी करीत होते मात्र या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार विनायक थविल यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. तर संदीप मुसळे हा फरार झाला आहे. ..

विद्यार्थ्यांनो यशवंत, गुणवंत व्हा, भविष्यात आईवडिलांना न विसरता परिवाराकडे लक्ष द्या

विद्यार्थ्यांनो जीवनात अजून मोठे व्हा, यशवंत व गुणवंत व्हा, उज्ज्वल भविष्य घडवा पण भविष्यात आईवडिलांना न विसरता परिवाराकडे लक्ष द्या, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आ. अमरिश पटेल यांनी आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या दहावीच्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळया प्रसंगी केले. आर. सी. पटेल मेन बिल्डींग मधील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल मध्ये शनिवारी १८ रोजी दुपारी १२ वाजता आ. अमरिश पटेल यांच्या हस्ते आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या दहावीच्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा झाला...

धक्कादायक...साक्री तालुक्यात भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं

सामाजिक प्रतिष्ठेला जपण्याच्या भरात सख्या भावाने बहिणीचा जीव घेतला आहे. ..

आर. सी. पटेल आयएमआरडी बी.बी.ए. आणि बी.एम.एस.च्या विद्यार्थ्यांची कॅम्पस् प्लेसमेंट मध्ये निवड

येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आयएमआरडी परिसंस्थेतील पदवी विभागातील बी.बी.ए. व बी.एम.एस. च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड करण्यात आली...

गोदामातून शेतीमाल चोरणाऱ्या चौघांच्या पिंपळनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोदामातून शेतमाल चोरणारी टोळी पिंपळनेर पोलिसांनी जेरबंद केली आहे.हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीचा मालही हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीकडून इतरत्र चोऱ्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. पिंपळनेर ता. साक्री येथील माळी गल्लीत रहाणारे विजय देविदास पेंढारकर यांच्या मालकीचे भाईंदर गावाच्या शिवारात धान्य साठविण्याचे पत्र्याचे शेड असलेले गोडावून आहे...

१०० रुपयांच्या लाच प्रकरणी कारकूनास अटक

मतदार यादी मधील नाव दुरुस्त करण्यास शंभर रुपयांची लाच घेणाऱ्या शिंदखेडा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे (52, रा.सूर्योदय कॉलनी देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक केलेली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटाची झोप उडाली आहे...

आर सी पटेल महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

येथील आर. सी. पटेल महाविद्यालयात संगणक विभागातर्फे बक्षीस वितरण सोहळा व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील तर उपप्राचार्य डॉ.ए.एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती...

महाराष्ट्रातला सर्वात मोठा ट्रक घोटाळा, 2 जण अटकेत, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने महागड्या ट्रकची विक्री करणाऱ्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे...

विहरीचा भाग कोसळून आईसह १० वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

मोरशेवडी येथे विहरीचा भाग कोसळून आईसह १० वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे. ढिगाऱ्याखाली अडकून गुदमरून दोघांचा मृत्यू झाला...

देवरे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन मध्ये स्पंदन २०२२ चा शुभारंभ

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांच्या अविष्कार असणार्‍या दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अर्थात स्पंदन २०२२ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य शुभारंभ शनिवार दि १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाचे अध्यक्ष मा दादासाहेब सुभाष देवरे यांच्या शुभ हस्ते तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य प्रमोद कचवे यांच्या प्रमुख ..

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षणाची सोय : आ. अमरिश पटेल

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षणाची सोय करण्यात आली असून शिरपूर तालुक्याला सर्वोत्तम शैक्षणिक दर्जा प्राप्त करुन दिला आहे. भूपेशभाई पटेल यांनी देखील मनापासून सामाजिक कार्यात वाहून घेतले असून नागरिकांच्या लहान लहान समस्या समजून ते मदतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात...

धक्कादायक..धुळ्यात 89 तलवारीसह 90 शस्त्रे जप्त

महाराष्ट्रातील धुळ्यात एका स्कॉर्पिओमधून 89 तलवारी 90 weapons seized आणि खंजीरासह 90 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत...

'१ मे'ला तहसीलदार पती विरोधात पत्नीचे उपोषण

शिंदखेडा : वैशाली सुनील सौंदाणे या शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे यांची धर्मपत्नी असून त्यांनी विभागीय महसूल आयुक्तांना निवेदनात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुलांसोबत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे...

शासकीय औद्योगिक संस्थेत गुरुवारी रोजगार मेळावा

धुळे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार, प्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन गुरुवार २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त शं. बा. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. ..

धुळ्यातील प्रसिद्ध डोलची होळी ; जाणून घ्या माहिती

संपूर्ण देशात आणि राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा सण राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते. ..

तर्‍हाड कसबेत आकडे टाकून वीजचोरी ९ जणांवर गुन्हा दाखल

धुळे : वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून चोरीची वीज वापरणार्‍या ९ इसमांवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणतर्फे सध्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली मोहीम जोमाने सुरु आहे. ..

केमिकल टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर आगीचा भडका, दोघांचा होरपळून मृत्यू

येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे...

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत दोन गटांत जोरदार राडा, मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल १९ रोजी जाहीर झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच ठिकठिकाणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याच दरम्यान धुळ्यातील साक्री येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. जल्लोष सुरू असताना दोन गटांत किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याच दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे...

धुळे-नंदुरबार विधानपरिषदेचे माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांचा विधानभवनात शपथविधी

शिरपूर : धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आ.माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा मुंबई विधानभवन येथे शपथविधी समारंभ झाला. धुळे नंदुरबार विधानपरिषदेचेमाजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांचा मुंबई मंत्रालय, विधानभवन येथे २० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी समारंभ पार पडला. ..

शिरपूर पीपल्स बँकेच्या एटीएम लुटीचा प्रयत्न

शिरपूर : शहरातील गजबजलेल्या मेन रोडवरील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम वर धाडसी दरोडा टाकून लूट करण्याचा प्रयत्न करण्यात एका दरोडेखोराला अपयश आले. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे व आरडाओरड केल्याने सदरच्या अनर्थ टळला आहे. ..

धुळे बोगस लसीकरण प्रकरण,आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कागद हस्तगत

धुळे : महापालिकेच्या बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणात मनपा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयातून धुळे शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी काही संशयास्पद कागदपत्र हस्तगत केले. यातून या प्रकरणा संदर्भातील काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस प्रशासनातर्फे वर्तविण्यात येत आहे. ..

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘नाम' चा मदतीचा हात

राज्य शासनात राज्य परिवहन विभागाचे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील अडीच महिन्यापासून संपावर आहेत. ..

रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन मॉडेल हॉस्पिटल बनविणार - भूपेशभाई पटेल

शिरपूर : स्व. हेमंतबेन (मम्मीजी) पटेल मेमोरियल आय हॉस्पिटलचे भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने झाले असून १०० बेडचे हे प्रस्तावित हॉस्पिटल लवकरच २०० बेडचे करण्यात येईल. नेहमी मी पडद्यामागून काम करतो. मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आहोत. मोतीबिंदू शिबीर घेऊन आतापर्यंत आपण हजारो रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना लाभ मिळवून दिला आहे. एस. व्ही. के. एम. फाउंडेशन मार्फत मेहा दीदी व द्वेता दीदी यांनी देखील आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. ..

अ.भा.बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी ऍड.सुहास वैद्य

शिरपूर : अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून समाजासह तरुण, महिला आणि राष्ट्रहितासाठी केले जात असलेले कार्य उल्लेखनीय असून गौरवास्पद आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्याचे कौतुक केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी अमृता फड़णवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ..

साक्री महाविद्यालयात, राष्ट्रीय ग्राहक पंचायत दिन साजरा

साक्री : येथील विमलबाई पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे होते. यावेळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे साक्री तालुकाध्यक्ष प्राचार्य बी.एम.भामरे, प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख, डॉ.दिलीप चोरडिया, सचिव विलास देसले, डॉ.सचिन नांद्रे, प्रणेता देसले, के.एस.बच्छाव, जोशीला पगारीया उपस्थित होते. ..

कोविडमुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

धुळे : ‘कोविड-१९’ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड१९’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांनी तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. ..

धुळ्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 39 दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत आहे. धुळ्यात संपकरी एसटी बस कर्मचाऱ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे...

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेमार्फत पर्यावरण दूतांची निवड

शिरपूर : महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात माझी वसुंधरा अभियान २.० ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्षा भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण दूत यांची निवड करुन नियुक्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी पार पडला. ..

विधानपरिषदेवर धुळे-नंदुरबार मतदार संघातून अमरिशभाई पटेल बिनविरोध

धुळे - नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी झालेल्‍या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे. विजय निश्चित झाल्यानंतर अमरीश पटेल यांच्या शिरपूर येथील घराबाहेर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष केला...

वृक्ष संवर्धन समितीने केली 20 रोपांची लागवड

शिंदखेडा : वृक्ष संवर्धन समितीने वरूळ रोड वरील स्वामी समर्थ केंद्र, विरदेल रोड परिसरात 20 रोपांची लागवड केली असुन तीन वर्षापासुन लागवड करुन झाडांचे संगोपन करण्याचे काम समिती करीत आहे. ..

दोंडाईचा येथील राजपथावर २५१ जोडप्यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिंदखेडा प्रतिनिधी : माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतुन साकार होत असलेल्या दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुली ते गर्ल्स हायस्कूल पर्यंत असलेल्या रस्त्याला 'राजपथ' असे नामकरण करण्यात आले असून या रस्त्यावर आज दोंडाईचा शहरातील २५१ जोडप्यांनी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण केले...

शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय निधीसाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन

शिंदखेडा : शिंदखेडा विकास संघर्ष समितीने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना जन आशीर्वाद यात्रा निमित्त चिमठाणे ता. शिंदखेडा येथे आले असतांना निवेदन देण्यात आले. ..

पदव्युत्तर वर्गांच्या प्रवेशासाठी मुदत वाढ मिळावी - अमोल मराठे यांची मागणी

शिंदखेडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए., एम.कॉम. व एम.एस्सी. वर्गांच्या प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू असून विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी २० ऑगस्ट २०२१ पर्यंत अंतिम मुदत घोषित केलेली आहे. ही मुदत ३० ऑगस्ट,२०२१ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्यावतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलगुरूंकडे केली आहे...

पदवीधर नावनोंदणीस म्हसदीत भाजपकडून प्रारंभ

म्हसदी, ता.साक्री : पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी खानदेशात अजूनही कोणालाही मिळाली नाही. त्यासाठी धुळे जिल्ह्यातील उमेदवारासाठी सर्व ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष बळ लावणार आहे. चालून आलेल्या संधीच सोनं करा, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केले. धनदाई देवी मंदिर मंगल कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर नावनोंदणी अभियान मोहिमेचा आरंभ पवार यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते...

महसूल दिनानिमित्त शिरपूरचे तहसिलदार आबा महाजन यांचा गौरव

शिरपूर : १ ऑगस्ट रोजी महसूल दिवस गेल्या वर्षभरात विविध प्रकारची शासकीय कामे व योजनांची अंमलबजावणी उत्कृष्टपणे केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातून 'उत्कृष्ट तहसीलदार' शिरपूरचे तहसिलदार आबा महाजन यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले...