डाव्यांच्या वर्चस्वामुळे माध्यमांत काम करु न शकणारी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा जपणारी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मंडळीही माध्यमांत ‘५जी’मुळे हव्या त्या ठिकाणाहून काम करु शकतील. ..
राजस्थानातही गेहलोत आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात, तर गांधी कुटुंब पायलट यांना. यावरुनच आमदारांनी अशोक गेहलोतांसाठी राजीनामे दिले..
युक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेत भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलेले १६ मिनिटांचे भाषण केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीही पथदर्शक ठरावे...
चित्ते भारतात आणून पुन्हा रुजविण्याचा प्रयोग चित्तथरारक आहेच; पण त्याचबरोबर तो दीर्घकाळ चालणारा व तिथल्या जैवविविधतेवर परिणाम करणारा प्रयोग आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे...
गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईतून, शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यातून हिंदूविरोधी, देशविरोधी ‘पीएफआय’च्या विनाशाला सुरुवात झाल्याचे, ‘पीएफआय’च्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकल्याचे दिसते.
..
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी गटाने तसे एक पत्रच आपल्या महत्त्वाच्या मंडळींना लिहिले आहे. त्यात आपण देशातील सामाजिक व राजकीय आंदोलनांत सहभाग घेऊन अशांतता पसरवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे...
आपल्याला नवे राष्ट्रीय ‘लॉजिस्टिक’ धोरण तयार करायचे असून त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून विविध प्रकल्प पूर्ण करायला हवेत, हे मोदींनी देशाची सत्ता हाती घेताच निश्चित केले होते...
ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदूविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे.
..
सर्वेक्षणादरम्यान अनेक मदरशांना अवैध ठरवण्यात येऊन त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात येईल,
असे ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने म्हटले. याला ‘चोराच्या मनात चांदणे’, असेच म्हणावे लागेल...
याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार! क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते.
..
योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर आणि त्यावरील ओवेसींच्या टीकेनंतर हिंदू भावविश्वात आता ‘कलम 30’ वर चर्चा सुरू झाली आहे...
एरवी ‘पधारो म्हारे देश’ म्हणत जगभरातील पर्यटकांचे आतिथ्य करणार्या राजस्थानमध्ये २०२१ साली सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात नुकतेच उघड झाले...
मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते.
..
पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो...
घुसखोर रोहिंग्यांना दिल्लीत सदनिका देण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर करताच मोदी सरकार कसे अल्पसंख्याकविरोधी, असंवेदनशील म्हणून पुरोगाम्यांनी टाहो फोडला...
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही...
इस्लामी कट्टरपंथीयांचा बहुसंख्यांनी विरोध करण्याचे कारण त्यांनी स्वतःच आपल्या कृतीतून दिलेले आहे, इस्लामोफोबियाला कारणीभूत स्वतः धर्मांध मुस्लीमच आहेत...
भारत शतकानुशतकांपासून ‘लव्ह जिहाद’च्या या समस्येचा सामना करत आला आहे. आता ग्रीसच्या माध्यमातून जागतिक स्तरावरही ‘लव्ह जिहाद’ची समस्या चर्चिली जायला लागल्याचे दिसत आहे.
..
काँग्रेसी जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर झुकण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही. मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी, अशी त्यांची इच्छा असते...
अमेरिका तैवानला आपल्या प्रभावाखाली ठेवू इच्छिते. चीनने तैवानशी युद्ध केल्यास अमेरिकेने त्यात पडण्यामागे या मुद्द्यांचा मोठा वाटा असेल, तर चीनची परिस्थिती याहून वेगळी आहे...
आता नेमका कुणाकडे वाडगा घेऊन जावा, असा पाकिस्तानसमोरचा प्रश्न आहे. पण, भारतावर टीका करण्याचा मूर्खपणा करण्याचा वारसा काही बिलावल भुट्टोंनी सोडलेला नाही.
..
मोदीविरोधी छद्मपुरोगामी टोळक्याचे मेरुमणी असलेल्या रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल उच्चारलेल्या दोन चांगल्या शब्दांबद्दल त्यांचे खरेतर अभिनंदनच केले पाहिजे. ..
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची ‘ईडी’ चौकशी होत असताना द्रौपदी मुर्मूंच्या रुपात एक गरीब, वनवासी समाजातील महिला राष्ट्रपतीपदावर आरुढ झाल्याचे काँग्रेसला सहन झालेले नाही...
उद्धव ठाकरेंची मुलाखत जितकी असबद्ध होती तितकीच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचालही असबद्धच होती. फरक एवढाच की, आता त्यावरची सत्तेची झालर उडाली आहे...
इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा...
परवाच फडणवीस-शिंदे सरकारने कोरोना काळातील जाचक निर्बंधांतून सण-उत्सवांना सर्वार्थाने मुक्त केले. त्यामुळे हे सरकार नुसते नामधारी हिंदुत्ववाद्यांचे नसून कृतिशील हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे मजबूत सरकार आहे, हा स्पष्ट संदेश राज्यातील जनतेलाही तितकाच सुखावणारा म्हणावा लागेल.
..
‘पीएफआय’सारखी धर्मांध संघटना कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झाली, त्याचे परिणाम काय होऊ शकतात व ‘पीएफआय’ने इस्लामी राष्ट्र स्थापनेसाठी आणखी २५ वर्षांचा कालावधीच का निश्चित केला? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यांच्या उत्तरांचा तपास केला असता ‘पीएफआय’च्या स्थापनेचे धागेदोरे ऑटोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत मागे जातात...
राज्यघटना असभ्य शब्दांच्या वापराची परवानगी देत नाही आणि आता प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यावर पुढील कारवाई होणारच. तथापि, यातून फक्त मुमताज मन्सुरीच नव्हे, तर इतरांनीही योग्य तो बोध घेतला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणारच, अभिव्यक्तिस्वातंत्र्याआड चुकीला माफी मिळणार नाहीच...
पाण्याचा पुर्नवापर व त्यासाठी भरपूर प्रबोधन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही संकटे दूर करता येऊ शकतात. केवळ भाबडा पर्यावरणवाद यासाठी उपयोगाचा नाही...
फुकट संस्कृतीच्या माध्यमातून जनतेला आपले आश्रित करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. कारण, एकदा जनता छोट्या-छोट्या सोईसुविधांसाठी आपली आश्रित झाली की, आश्रितांकडून गुलामी करवून घेणे सोपे जाते. अन् त्यानंतर गुलामांनी स्वतःची बुद्धी चालवू नये यासाठीच प्रयत्न केले जातात.
..
घराणेशाहीचा नाग देशाच्या सार्वभौमत्वाला कसा विळखा घालतो आणि एखादे संपन्न राष्ट्र अराजकाच्या गर्तेत कसे ओढले जाते, त्याचे श्रीलंका हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. ..
अजमेर दर्ग्याच्या खादिमांनी नजीकच्या काळात हिंदूंविरोधात भडकाऊ आणि चिथावणीखोर विधान केली असून त्यातूनच शराफतच्या बुरख्याआड लपलेला खादिमांचा भेसूर चेहरा समोर येत आहे. ..
हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. ..
महाराष्ट्र विधानसभेच्या MH Legislative Assembly अध्यक्षांची 288 सदस्यांच्या सभागृहात 164 मते मिळवून बहुमताने निवड झाली आणि सरकारमागे स्पष्ट बहुमत असल्याचे बहुमत चाचणीआधीच स्पष्ट झाले.
..
एकेकाळी अमेरिकेच्या मिलो गव्हाची आयात करणारा देश आज मोदी सरकारच्या नेतृत्वातील गहू निर्यातीच्या निर्णयाने भारताची उंची हिमालयापेक्षाही अधिक झाली आहे. ..
जे जे घराणेकेंद्रित पक्ष आहेत, त्यांनी खरे म्हणजे आतापासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडातून बोध घ्यायला हवा. कारण, पक्ष स्थापन करणारा नेता कर्तृत्ववान असू शकेल. ..
एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच राहात नाही आणि बंड शमले असे गृहीत धरले तरी यापुढे शिंदेंकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. ..
चर्चा बुलडोझरची होणार असेल, तर नमाजनंतर दगड मारण्याचीही व्हायला हवी. गोध्रा जळीतकांडावर बोलायचे नाही. मात्र, गुजरात दंगलीच्या पिपाण्या वाजविण्याइतकेच हे दांभिक आहे.
..
धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले..
कानपूर Kanpur case येथे नुकतेच झालेली दंगल भारतातील मुस्लिम समाजाची मानसिकता दर्शविणारी आहे. समाजातील वैरभाव आणि शत्रुत्व संपविण्याला खूप वेळ आणि शक्ती लागणार असल्याचे ही दंगल निदर्शक आहे.
..
नुपूर शर्मांच्या निमित्ताने भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न कसा झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे. देश एक महत्त्वाची शक्ती म्हणून आकाराला येत आहे. हा प्रवास समजून घेतला पाहिजे...
मोदी सरकारने आधी विकास आणला, जनतेत विश्वासाची भावना निर्माण केली, त्याने सशस्त्र गटांनाही मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्याच्याच परिणामी हिंसाचार करणारेच कमी झाल्याने हिंसक घटनाही थांबल्या व ‘आफ्स्पा’ची उपयुक्तताही संपली...
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच होत आली. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर तर देशाच्या अर्थव्यवस्थेने अधिकच वेग धारण केला. ..
काँग्रेसला अजिबात सुधारायचे नाही, तर जे आतापर्यंत करत आलो, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात हिंदूंना धुडकावण्याचे अन् मुस्लिमांना गोंजारण्याचे राजकारण काँग्रेसला करायचे आहे..
आता जे काही पंजाबमध्ये सुरू आहे ते हिमनगाचे लहानसे टोक आहे. हा हिमनग एखाद्या समस्येचा नाही, तर त्याला अनेक आयाम आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही...
राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणतात, त्याचा अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असा होतो...
शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते...
महाराष्ट्रात इंधनाच्या दरावरून fuel price रंगलेला कलगीतुरा खरोखर रंजक आहे आणि थापेबाजीचा कळसही आहे. भारतात इंधनाचे दर इतर देशांच्या तुलनेत अधिकच आहेत हे खरे...
असे म्हणतात की, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी शेवटी कडू ते कडूच! परवाच्या शरद पवारांच्या ब्राह्मण समाज संघटना प्रतिनिधींच्या भेटीचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तरही याच म्हणीत दडले आहे...
महाराष्ट्रातील १५ महानगरपालिका, २२० नगरपालिका व २५ जिल्हा परिषदांसह सुमारे २४५० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला देतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court राज्य शासनाचे वाभाडे काढले आहेत.
..