Thursday, 3 April, 2025

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

मुदतबाह्य बियर चक्क दुकानात विक्रीला ?

    दिनांक : 08-Sep-2022
Total Views | 20
 
बियर प्यायल्यानंतर तरुणाला झाल्या उलट्या !
 
जळगाव: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बियर पीत होते. त्यातील एका तरुणाला बियर प्यायल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बियरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली. काही जणांना बिअरचे जास्त सेवन केल्याने उलट्या होऊ शकतात. मात्र, जळगाव शहरात काहीसा वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उत्पादक शुल्क विभागाला संबंधित वाईन शॉपवर कारवाई करावी लागल आहे.
 

bear1
 
 
 
 
सविस्तर प्रकार काय ?
 
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बियर पीत होते. त्यातील एका तरुणाला बियर प्यायल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बियरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली.
 
तरुणांच्या तक्रारीनंतर उत्पादक शुल्क विभागाने संबंधित जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज वाईनवर कारवाई केली आहे. या कारवाईत दुकानात अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले असून हा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईने खळबळ उडाली आहे
भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती भरारी पथकातील सी.एच. पाटील यांनी दिली आहे.
अन्य बातम्या