देवगावजवळ आयशरची कालीपिलीला धडक; ६ जखमी

    दिनांक : 07-Sep-2022
Total Views |
धानोऱ्याजवळील देवगाव फाट्याजवळील अपघात
 
जळगाव : जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या कालीपिली वाहनाला आयशरने धडक दिल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ घडली असून यात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
 

Devgaon0 
 
आज दुपारी कालीपिली वाहन चोपड्याकडे जात असताना धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ आयशर ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत शोभा विनोद आढाळे (वय 30 पिंप्राळा) श्रीरामरुपसिंग (वय 45), बन्सीलाल सुरसिंग (वय 35) ,घनश्याम आढळकर (वय 38), सर्व रा. धानोरा नितीन सोनवणे (वय 38), मनोज गवळी (वय 35 रा. शनिपेठ) आदी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत.