मुंबई : ‘गाव तिथे एसटी’ व‘प्रवाशांच्या सेवेसाठी’अशी संकल्पना राबवून एसटी महामंडळ प्रवाशांची सेवा व सुविधेला प्राधान्य देत आले आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांना आता दोषी ठरवण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी थांबे निश्चित करण्यात आले असल्याने अशा ठिकाणी बस थांबविणे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र अनेकदा गावातील रस्त्यावरील लहान थांब्यांवर प्रवासी न पाहताच चालक गाडी सुसाट नेतात.कधी कधी हे चालक विद्यार्थ्यांचाही विचार करीत नाहीत . कधी कधी तर विनंतीवरून थांबा असलेल्या ठिकाणाला तर हे चालक गौण समजतात व प्रवाशांना सांगतात कि हा थांबा वैध नाही . . त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या खेड्यापाड्यातील अशा गावांमध्ये एसटी शिवाय वाहतुकीचा दुसरा पर्यायही उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने महामंडळाने नियोजित थांब्यावर बस न थांबविल्यास चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.