तीन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच पाकने स्वीकारला 'त्या' आतंकवाद्यांचा मृतदेह

    दिनांक : 06-Sep-2022
Total Views |
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह स्वीकारण्यास पाकिस्तानने नेहमीच नकार दिला आहे. 1999 च्या कारगिल युद्धातही पाकिस्तानने भारतीय लष्कराशी लढताना मारल्या गेलेल्या त्यांच्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला होता.
aatankwadi 
 
 
 
 
 
दरम्यान पाकिस्तानी लष्कराने तीन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारला आहे. हा दहशतवादी आपल्या देशाचा नागरिक असल्याचे पाकिस्तानने अखेर मान्य केले. माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटली येथील सब्जकोट गावातील 32 वर्षीय दहशतवादी तबराक हुसेन यांचा मृतदेह पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) चकन दा बाग क्रॉसिंग पॉईंटवर पाकिस्तानी समकक्षांना सुपूर्द केला आहे. . नागरी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह पाकिस्तानकडे सोपवण्यात आला.
 
राजौरी आर्मी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी हुसैन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. गेल्या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी राजौरीतील नौशेरा सेक्टरमधून नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करताना त्याला पकडले होते. Pakistan यादरम्यान त्याच्या पायाला आणि खांद्याला गोळी लागली. दरम्यान सुरक्षा दलांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तबरक हुसेन याने लष्करी रुग्णालयात सांगितले होते की, त्याने भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्यासाठी पैसे आणि चार ते पाच बंदुका देण्यात आल्याचेही त्याने मान्य केले होते. 2016 मध्ये हुसैनला त्याचा भाऊ हारून अलीसह याच सेक्टरमध्ये पकडण्यात आले होते. दरम्यान त्याला पुन्हा पाकिस्तानात पाठविण्यात आले होते.