धक्कादायक... काबुल मध्ये बॉम्बस्फोटात रशियन दुतावासाच्या दोन अधिकाऱ्यांसह २० जणांचा मृत्यू

    दिनांक : 05-Sep-2022
Total Views |
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये Kabul भीषण स्फोट झाला आहे. दारुल अमान रोडवर रशियाच्या दूतावासाजवळ हा स्फोट झाला. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 72 तासांतील हा दुसरा मोठा स्फोट आहे. ज्यावेळी हा बॉम्बस्फोट (Bomb blast) झाल त्यावेळी नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. या दुर्देवी घटनेत दुतावास मध्ये असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह वीस जणांनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 

spot 
 
 
 
रशियन सरकारी संस्था आरआईए नवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी खूप नागरिक विसा काढण्यासाठी रांगेत उभे होते. एक रशियन अधिकारी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आला, त्याचवेळी मोठा स्फोट झाला. हा बॉम्बस्फोट करणारा दहशतवादी होता. हल्ला केल्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला जागीच ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
दरम्यान, या हल्ल्याबाबत कोणत्याही संघटनेनं पुष्टी केली नाहीय. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगानिस्थानमध्ये झालेला हा पहिला हल्ला होता. मागील वर्षी अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांनी अफगानिस्थान सोडण्याच्या आधी इस्लामिक स्टेट ग्रुपशी जोडलेल्या हल्लेखोरांनी तालिबानवर हल्ले करणं बंद केलं होतं.