जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदार मंगेश चव्हाणांचे फेसबुक अकाउंट हॅक

    दिनांक : 29-Sep-2022
Total Views |
 जळगाव  : सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
 

mangesh
 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडियावरील फेसबुक अकाऊंट मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हॅक केलं. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा कपडा लपेटलेला चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, फेसबुक पेजचे काम पाहणाऱ्या कार्यालयीन कर्मचारी गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिड कार्डमधून 70 हजार काढून फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी (29 सप्टेंबर) जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.
 
ओटीपी न घेता काढले पैसे
 
दरम्यान, सोशल मिडीया हाताळताना कोणालाही पासवर्ड, ओटीपी देऊ नये असे पोलिसांकडून नेहमी सांगीतले जाते. फसवणूक करणारे भामटे नेहमी बोलण्यात गुंतवून, विश्वास संपादन करुन लोकांना ओटीपी विचारुन घेतात. परंतु, या प्रकरणात मात्र भामट्याने ओटीपी विचारलेलाच नाही. त्यामुळे पैसे कसे विड्रावल झाले हा मोठा पेच पोलिसांच्या समोर आला आहे. अशाही पद्धतीने पैसे निघत असल्याचे समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात सायबर पोलिस तपास करीत आहेत.