नवी दिल्ली : आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तेव्हा नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवरात्री स्पेशल थाळी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. तेव्हा तुम्ही नवरात्रीत ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुम्हाला स्वच्छ आणि सात्विक अन्न खायला आवडत असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी नवरात्री विशेष थाळीची विशेष व्यवस्था केली आहे. आयआरसीटीसीच्या या उपक्रमानुसार प्रवाशांना ट्रेनमध्येच त्यांच्या सीटवरच ही थाळी दिली जाणार आहे. बस प्रवासादरम्यान, तुम्हाला IRCTC द्वारे संचालित केटरिंग हेल्पलाइन नंबर 1323 डायल करावा लागेल आणि तुमच्या आवडत्या नवरात्री थाळीची ऑर्डर द्यावी लागेल.