कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रोडवरील अतिक्रमणे काढा - नगरसेविका दीपमाला काळे यांचे आयुक्तांना पत्र

    दिनांक : 25-Sep-2022
Total Views |
कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रोडवरील अतिक्रमणे काढा - नगरसेविका दीपमाला काळे यांचे आयुक्तांना पत्र
 
जळगाव : शहरातील अतिशय वर्दळीचा मानला जाणारा रस्ता कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंतचा असून या किरकोळ विक्रेत्यांना परिसरात जागा दिली असतानाही रस्त्यावरअस्ताव्यस्त पद्धतीने गाड्या लागलेले असतात यामुळे नागरिकांना अपघात होऊन अपरिहार्य घटना घडू शकते याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे पत्र नगरसेविका दिपमाला मनोज काळे यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ विद्या गायकवाड याना दिले.


kale 
 
कोर्ट चौक ते गणेश कॉलनी हा १८ मिटरचा डी.पी.रोड असुन या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये, क्लासेस तसेच पिंप्राळा, खोटे नगर, शिवाजी नगर, भोईटे नगर या परिसरातील नागरिक बरजंग बोगदा मार्गे या रस्त्यावरून ये - जा करीत असतात. या रस्त्यावर भाजीपाला, फळ विक्रेते यांना ख्वॉजामिया चौकात बसण्यासाठी जागा दिलेली असुन ते सर्व भाजीपाला, फळ विक्रेते हे त्याठिकाणी न बसता रस्त्यावरती हातगाडी व स्टॉल लावतात. त्यामुळे त्याठिकाणी फळे व भाजीपाला घेण्यासाठी बरेचसे नागरिक थांबतात. या ठिकाणी रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
 
प्रसंगावधान अपघातही घडू शकतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांना सांगितले असता आमच्याकडे कर्मचारी नाही असे सांगुन त्यांची जबाबदारी ते झटकत असतात. त्यामुळे याकडे आपण स्वता लक्ष देत लवकरात लवकर या रस्त्यावरील भाजीपाला व फळ विक्रेते यांना त्यांना दिलेल्या जागेत बसवावे व माझ्या वॉर्डातील नागरिकांचा त्रास कमी करावा. त्वरीत कारवाई न झाल्यास मी माझ्या वॉर्डातील नागरिकांसहीत महापालिकेसमोर उपोषणास बसणार आहे याची नोंद घेण्यात यावी, असे आशयाचे पत्र २३ रोजी आयुक्तांना दिले.