दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा ; ७५ हजार रिक्त पदांची भरती
मुंबई : राज्यातील तरुण वर्गासाठी शिंदे-फडणवीस सरकार कडून दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठे गिफ्ट मिळण्याची घोषणा या सरकारने केली आहे. राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगा भरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय विशेष संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेटमध्ये पार पडणार आहे असून रेल्वे व केंद्रीय परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मेगाभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात भरली जातील, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मागेच विधान परिषदेत केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने ही मेगाभरती प्रत्यक्षात करण्याची घोषणा आता केली आहे. त्यामुळे राज्यभरतील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.