दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकमक , 100 सैनिकांचा मृत्यू
येरेवन : युक्रेन आणि रशिया यांच्यात अजूनही युद्ध war सुरूच आहे, त्यातच आता आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सीमेवर चकमक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे सुमारे 100 जवान शहीद झाले आहेत. आर्मेनियाचे म्हणणे आहे की, या रक्तरंजित चकमकीत त्यांचे 49 सैनिक ठार झाले आहेत, तर अझरबैजानने देखील 50 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे. अझरबैजानी सैन्याने आर्मेनियन प्रदेशाला लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले. काही वेळातच गोळीबार सुरू झाला आणि संघर्ष अजून वाढला. आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, गोळीबार जास्त नसला तरी अझरबैजानी सैन्य त्यांच्या प्रदेशात पुढे जात होते. अशा स्थितीत त्यांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आर्मेनियन सैनिकांनीही गोळीबार सुरू केला.
त्याचवेळी आर्मेनियाने चिथावणी दिल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. आर्मेनियन सैन्याने सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी पुन्हा हल्ले सुरू केले. पुढे आलेल्या माहितीनुसार, नागोर्नो-काराबाख या दोन देशामध्ये अनेक दशकांपासून संघर्ष सुरु आहे. अझरबैजान देखील या भागावर दावा करतो, परंतु 1994 च्या फुटीरतावादी युद्धापासून ते आर्मेनियनच्या ताब्यात आहे. दरम्यान, अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर war पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. याशिवाय त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही चर्चा केली आहे. युरोपीय परिषद आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हस्तक्षेपही या संपूर्ण युद्धात दिसून येतो. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही दोन्ही देशांशी संवाद साधला आहे. ब्लिंकेन म्हणाले की, आम्हाला आशा आहे की दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर येतील आणि चर्चेतून तोडगा काढतील.