गणेश चतुर्थी विशेष रेसिपी उकडीचे मोदक.

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |
जळगाव तभा : बाप्पा येणार म्हंटले कि एक वेगळे चैतन्य ,आनंद , उत्साहाचे वातावरण आणि एक वेगळी शक्ती आपणा सर्वांमध्ये संचारते. . असा हा बाप्पा महाराष्ट्रात, राष्ट्रात न्हवे तर आंतरराष्टीय भक्तांचा पण आहे. गणपती म्हंटले की, आनंद, विश्वास, एक हक्काचा देव ह्याच्याशी सहज हितगुज करता येईल असा, गणराय... अशा या गणपतीला प्रिय आहे उकडीचे मोदक... चला तर मग पाहूया गणेश चतुर्थी विशेष पदार्थ उकडीचे मोदक.
 
 
 

modak 
 
 
उकडीसाठी साहित्य :
 
Modak ४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ
 
सारण :
 
Modak १ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.
उकड काढण्याची कृती:
 
Modak प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.
 
मोदक करण्याची कृती:
 
१. उकडीचा Modak एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
२. या Modak गोळ्याची वाटी बनवा.
३. दोन्ही Modak हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
४. या Modak वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
५. आता वाटीला Modak एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
६. एक एक Modak करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
७. मग मोदक Modak तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
८. Modak मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
 
या नंतर Modak मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
टीप : Modak सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.