मुंबई : मुंबईतबोरीवलीमधील साईबाबा नगरमधील गितांजली हि चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत दुपारी चार मजली इमारत कोसळली.
मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर परिसरात गीतांजली नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत काही वेळापूर्वी कोसळली. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये १२ ते १५ रहिवासी अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.
बोरिवली परिसरातील गीतांजली ही तळ अधिक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि वार्डातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य आणि मदतकार्य हाती घेतले. या इमारतीत १२ ते १५ जण अडकल्याची माहिती मिळते. अद्याप या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही