तुकाराम हुलवळेंना राज्यस्तरीय उत्कृष्ट उपजिल्हा निवडणूक अधिकारी सन्मान

    दिनांक : 17-Aug-2022
Total Views |
आवास योजनेत पारोळा, जामनेर सर्वोत्कृष्ट तालुके

जळगाव : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्यातर्फे तुकाराम हुलवळे यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक विभाग म्हणून पुरस्कृत करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे यांनी मतदार यादी शंभर टक्के छायाचित्र असलेली केली. निवडणूक आयोगातर्फे आदेश देण्यात आलेले उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
 


Tukaram Hulawade1 
 
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुक्याचा प्रथम क्रमांक पारोळ्याला मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचेला मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा प्रथम क्रमांक चोपडा तालुक्यातील अडावद क्लस्टरला मिळाला. जिल्हास्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुक्याचा प्रथम क्रमांक जामनेरला मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक बोदवड तालुक्यातील करंजीला मिळाला.

पाळधी खुर्दला प्रथम क्रमांक
 
सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा प्रथम क्रमांक धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्दला मिळाला. पोलिस पदक जाहीर झालेले जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनिष सपकाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील, मोटार वाहन शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चिरमाडे, एसीबीचे हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील व विशेष सेवा पदक प्राप्त झालेले सावदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
 
धाडसी युवकांचा सत्कार
 
रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण क्षेत्रात सुकी नदीच्या पात्रात 18 जुलै रोजी रात्री नऊ पर्यटक अडकले होते. रावेर तालुक्यातील नऊ युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना वाचवले. वाचवणाऱ्या इम्रान शाह इकबाल शाह रा.पाल ता.रावेर, दारासिंग रेवलसिंग बारेला रा.गारबर्डी ता.रावेर, गोविंदा जनार्धन चौधरी रा.खिरोदा ता.यावल, सिकंदर गुलजार भील रा.गारखेडा ता.रावेर, संतोष दरबार राठोड रा.गारबर्डी ता.रावेर, धनसिंग बंडू भिलाला रा.गारबर्डी, महावीर बंडू भिलाला रा.गारबर्डी, छगनसिंग रेवलसिंग बारेला रा.गारबर्डी या नऊ धाडसी युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.