धक्कादायक...9 वर्षांच्या चिमुकलीला खेळताना आला अटॅक अन् ....

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
मुंबई : आतापर्यंत आपण वयस्कर लोकांना हार्ट अटॅक आल्याचे ऐकलं होत पण सोलापूरात एक अजब प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन ती कोसळली . सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या 9 वर्षांच्या अवनीचे हृदय 65 वर्षांच्या व्यक्तीसारखं कमकुवत बनलं होतं. ती खेळत असताना खाली पडल्यानंतर तिच्या आई वडिलांनी रुग्णालयात तिला नेल्यावर हा सगळा प्रकार समोर आला आहे.
 

avni 
 
 
 
एका वृत्तानुसार, सोलापूरच्या अवनीला वयाच्या 9 व्या वर्षी अचानक हर्ट अटॅक आला. दरम्यान तिला तातडीने मुंबईच्या एका मोठ्या रुग्णलयात हलवण्यात आलं तिच्यावर बायपास सर्जरी Attack and bypass करण्यात आली. अवनीच्या वडिलांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले कि, अवनी नेहमीप्रमाणे खेळत होती. खेळता खेळता अचानक तिच्या छातीत दुखू लागलं. छातीत जोरात कळ आली म्हणून आम्ही अवनीला सोबत घेऊन आणि दवाखाना गाठला. डॉक्टरांना दाखवलं तर हा सगळा प्रकार समोर आला आहे.आम्हाला तर ऐकून धक्काच बसला.